तुझ्या जगात आज ही !
- deepasvi mukt
- Apr 1, 2022
- 1 min read
Updated: Aug 31, 2023
तुझ्या जगात आजही
नभ, चांदने, पारिजात, अशा सौंदर्याची भाषा
माझ्याकडे मात्र भूक, जमीन, गुलामीच्या
प्रश्नाना सूटण्याची आशा..
शील -अश्लील, पवित्र-अपवित्र,
शुद्ध -अशुद्धाची अशी तुझी मनुनीती
इकडे माझ्या वेशी बाहेरच्या
घराला गावकिची भीती..
महिन्यातुन दोनदा तरी, तुझे
दौरे फॉरेन ला रंगती
माझ्या कडचे काय सांगू ?
ही पहिली पीढ़ी चौथीच्या वर शिकती..
तुझ सफेदपोश प्रदर्शन
म्हणे खुप कमालीच झाल
माझेच फोटू पोस्टर
राव, इकायला काढल..
सभा, सम्मेलनात तुझा
सम्मान दिमाखात सजतोय
गड्या, माझा आत्मसम्मानाचा
संघर्ष शतकाने झिजतोय..
तुझा धर्माचा धंदा
लय फाम मध्ये दौड़ितों
माझ्या चळवळीच्या आगीला
कोणी माचिस न पुसितो..
तुझे मजल्यावर मजले
भावा, पटापट चढ़ती
माझ्या दुबळ्या झोपडीला
प्रशासन दहा दफा तोडती..
तुला मागास, वंचितासाठी
खुप भारी सिम्पथी
बरोबरीची जागा देण्यास
बरे, मागे का हटती..
मी लोकशाहीच्या आरश्याला
मोठ्या तळमळीने चमकवते.
अणि तू त्या आरशात, निर्लज्जपणे
स्वतःचा चेहरा मिरवते..
जाती अंताच्या चळवळीसाठी
ऐकल, की तू जोमात निघालास
तुझ्यातील मनू संपूर्ण बाहेर पडला का
हे तपासून पाहिलास?
- दिपा पवार

Comments