आपल्या आदिवासी / घुमांतु समूहातील बोलीभाषेची गरिमा..
- deepasvi mukt
- May 1, 2022
- 1 min read
Updated: Aug 14, 2023
आदिवासी / घुमांतु समूहातील लहान बालके ही त्यांच्या कुटुंबात दैंनदिन जीवनात, व्यवहारात त्यांची बोलीभाषा बोलतील, वापरात आणतील यास प्रोत्साहन देणे.
नवीन नात्यात एकत्र आलेली जोडपी जर एकाच समूहातील असतील तर त्यांनी आपल्या समूहातील भाषेत संवाद करण्यास पुढाकार घ्यावा.
शिक्षण घेणाऱ्या बालकांवर प्रस्थापित भाषा बोलण्याची सक्ती न करता उलट त्यांना बोलीभाषेत अभिव्यक्ती , मांडणी , सादरीकरणास प्रोत्साहन हे घरच्यांनी तसेच शैक्षणीक संस्थानी देखील करणे.
आदिवासी /भटक्या विमुक्त समूहाने आपल्या बोलीभाषेचा कुठेही सार्वजनिक, शैक्षणिक, व्यावसायिक ठिकाणी वापर करण्यास संकोच न करता गरिमा पूर्ण आपल्या बोलीभाषेचा वापरास प्राधान्य देणे









Comments